भुकेचे तंत्र समजून घेणे खूप आवश्यक आहे. आपण ठरविलेल्या वेळी साधारणपणे भूक लागतेच, पण तरीही भूक लागली असेल तेवढेच अन्नग्रहण करावे. भुकेमुळे जीव कासावीस होण्याची वेळ येऊ देऊ नये. वेळेवर व भूक असेल तेवढेच जेवावे. पोटाला तडस लागेल एवढे कधीही खाऊ नये. भूक लागली असली तरी आपल्याला न पचणारे, पूर्वी कधीही न खाल्लेले, पहिल्याच घोटाला उचकी लागेल असे, कसे-बसे गिळावे लागते आहे असे अन्न खाऊ नये. अशा अन्नामुळे भूक भागवली गेली तरी पुढे आजारपणाला तोंड देण्याची वेळ येते. अर्धे पोट अन्नाने व पाव पोट पाण्याने भरावे आणि पाव पोट हवेसाठी जागा ठेवावी, जेणेकरून अन्न नीट पचून शरीराचे कल्याण होईल.
, झवणे कसे करावे, हिजडा कसा असतो, काळे डाग जाण्यासाठी उपाय, मुलगा होण्यासाठी काय करावे, बुला फोटो, गरोदर राहण्यासाठी काय करावे, मासिक पाळी फोटो, वजन वाढविण्यासाठी उपाय
"अन्नाद् भवन्ति भूतानि पर्जन्याद् अन्नसंभवः‘ आणि "यज्ञात् भवन्ति पर्जन्यः यज्ञ कर्मसमुद्भवः‘ असे भगवंतांनी सांगितलेले आहे. याचा अर्थ असा, की कर्म सुरू झाले रे झाले की त्यातून अग्नी उत्पन्न होतो. त्यामुळे जडाचे शक्तीमध्ये आणि शक्तीचे वस्तुमानामध्ये रूपांतर सुरू होते. पण दृश्यसृष्टी किंवा इंद्रियगोचर सृष्टी उत्पन्न होण्यासाठी अन्नाची गरज असतेच. एखाद्या फळातून, शेंगेतून निघालेली छोटी अळी आतड्याच्या छोट्या तुकड्यासारखीच दिसते. अळी पुढचे तोंड जमिनीला टेकवते, मागचा भाग उचलून पुढे आणून ठेवते व त्यावर भार ठेवून पुन्हा तोंड उचलून पुढे जाते. "अळीताई तुम्ही कुठे चालला आहात‘ असे विचारले तर त्या बिचाऱ्या काय म्हणणार? त्या चाललेल्या असतात अन्नाच्या शोधात. प्रत्येक प्राणिमात्राच्या पोटातील आतडी हीच ती उत्क्रांत झालेली अळी. त्यामुळे मनुष्यही अन्नामागे धावतोच. मनुष्याचा हाच प्रश्न विचारला तर तो "मी कामाच्या शोधात निघालेलो आहे‘ असे उत्तर देतो; परंतु शेवटी मनुष्य काम करतो ते अन्नासाठीच. कमीत कमी दोन वेळचे जेवण मिळायला हवे, यासाठी त्याची धडपड असते. मनुष्याच्या डोक्यावर जेव्हा छत नव्हते तेव्हा तो दगडाच्या आडोशाला राहू शकला. त्याच्याजवळ वस्त्रं नव्हती तेव्हाही त्याला काही अडचण भासत नव्हती. झाडांची साल, पानांचा उपयोग तो वस्त्राप्रमाणे करत होता.
ज्यावेळी या सृष्टीचा प्रलय होऊन पुन्हा सृष्टीची सुरवात होईल, त्या वेळी सुरवात होईल ती वनस्पती या जडांशापासून व पाण्याच्या रसभावापासून. सृष्टी जरी पंचमहाभूतांपासून निर्माण झालेली असली तरी सृष्टीत पृथ्वीतत्त्वाला व जलतत्त्वाला अधिक महत्त्व आहे. प्रलयाचा अग्नी सृष्टीवर काम करतो व त्यानंतर पुन्हा सृष्टीची निर्मिती होते. वाताचा सहभाग सृष्टीत असल्याशिवाय कुठलीही हालचाल होणार नाही. सृष्टीची रचना होण्यासाठी अवकाशाची म्हणजे आकाशतत्त्वाचीही आवश्यकता असते. सर्व प्राणिमात्र तसेच संपूर्ण जड विश्व वस्तुमान व शक्ती यांच्या खेळातूनच उत्पन्न झालेले आहे.
त्यामुळे सर्व प्राणिमात्रांची अन्न ही मूळ गरज आहे. "अन्नासाठी दाही दिशा‘ ही म्हणच शेवटी खरी आहे. अन्न न खाता काही लोक वर्षानुवर्षे राहतात असे म्हणतात; परंतु असा अपवाद हा काही तरी अघटित किंवा विक्षिप्त प्रकार मानावा लागेल; अन्यथा कोणीही अन्नाशिवाय जगू शकत नाही. वातावरणात असलेल्या सूक्ष्म कणांवर प्रयोग करून स्वतःच्या शरीराची गरज भागवली तर असे लोक शिजवून खाल्लेले अन्न खाताना प्रत्यक्ष दिसत नाहीत, त्यामुळे ते अन्नाशिवाय राहतात असे भासते. परंतु त्यांनीही कुठल्या ना कुठल्या प्रकारचे अन्न स्वीकारलेलेच असते. तसेच अन्न किती खावे असा काही नियम नसतो. घासभर खाणारी माणसे धष्टपुष्ट व ताकदवर असतात आणि कुंभकर्णी आहार घेणारे काहीच करू शकत नाहीत असेही दिसते. अन्न हवेच व पचायलाही पाहिजे हे तत्त्व मान्य करावे लागते.
"अंथरूण पाहून पाय पसरावे‘ असे म्हणतात, त्याप्रमाणे तोंड व दातांची रचना पाहून माणसाने जबडा उघडावा. यातूनच शाकाहारी, मांसाहार वगैरे अन्नाचे प्रकार तयार झाले. पण एक नक्की की अन्न ही माणसाची प्राथमिक गरज आहे. ही नैसर्गिक व्यवस्था असल्यामुळे एक गोष्ट नक्की की नैसर्गिक व्यवस्थेसाठी शरीरात नैसर्गिक घड्याळाची व्यवस्था पाहिजे. सूर्य उगवल्यावर सूर्याच्या उष्णतेमुळे म्हणा, किंवा त्याच्या अपरिमित शक्तीमुळे म्हणा, मनुष्य जागा होतो. जाग आल्यावर मनुष्य उठून बसतो. या उठून बसण्यालाही शक्ती लागते, उठल्यावर थोडे मोकळ्या हवेवर फिरून आल्यावर त्याच्या शरीराला अन्नाची गरज निर्माण होते. आता काही तरी खाल्ले पाहिजे असे शरीराचे घड्याळाकडून सुचवले जाते. या अवस्थेला मनुष्य "भूक‘ असे म्हणतो. ही भूक भागवली नाही तर मनुष्याच्या शरीराला विचित्र अवस्थेमध्ये जावे लागते, त्याचे संतुलन बिघडू शकते.
परंतु जीवनासाठी जिवंत असलेले अन्न खाणे आवश्यक असते. वनस्पतीवर प्रक्रिया होऊन किडे, त्यातून पुढे प्राणी, नंतर मनुष्य अशी जीवसृष्टीची उत्क्रांती झालेली आहे. खाण्यासाठी यातलाच कुठलातरी जिवंत पदार्थ लागतो. प्लॅस्टिकपासून बनविलेल्या द्रोणात काही खरी व काही प्लॅस्टिकपासून बनविलेलीपण हुबेहूब खऱ्या पानांसारखी दिसणारी पाने ठेवली तर कीड खऱ्या पानांनाच लागते, प्लॅस्टिकपासून बनविलेल्या पानांना नाही.
भूक लागल्यावर वेळच्या वेळी खाल्ले नाही तर शरीराला अपाय होऊ शकतो. शिवाय यामुळे शरीरात असणारी जाणीव नाराज होईल हे वेगळेच. महिनाभर काम करून पगार दिला नाही तर नोकरवर्ग जसा नाराज होईल, तशाच प्रकारची ही परिस्थिती म्हणता येईल. तेव्हा शरीराच्या घड्याळाचा मान प्रत्येकाने ठेवणे आवश्यक असते. याचा अर्थ मनुष्याने भूक लागल्यावर जेवावेच. भूक लागलेली नसताना जेवणे ही गोष्ट अनैसर्गिक असल्यामुळे शरीराला त्रास होऊ शकतो.
भुकेच्या वेळी जेवून घेणे हे जेवढे बरोबर आहे, तेवढेच आपल्या भुकेच्या वेळा निश्चित करून घेणे, त्या समजून घेणे आवश्यक आहे. सकाळी नाश्त्याच्या वेळी भूक लागते, त्यानंतर 11-12 वाजता भूक लागते, त्यानंतर 4-5च्या सुमाराला तोंडात काही तरी टाकावे इतपत भूक असते व त्यानंतर रात्री 8-9 च्या सुमाराला भूक लागते. या वेळा सोडून साधारणतः कोणाला भूक लागत नाही. पण मध्ये मध्ये सारखे काही तरी खाण्याने प्रकृतीला अपाय होण्याचा संभव जास्त असतो. भूक लागल्यावर आवडीच्या वस्तू खाव्या अशी सूचना शरीर नक्कीच करत असावे. कारण आवडीच्या वस्तू, त्या फार तिखट, आंबट नसतील त्या पचवणे अधिक सोपे जाते. सात्त्विक वस्तू पचवणे शरीराला अधिक सोपे जाते; परंतु खाणारा भूक भागवण्यासाठी आपल्या जिभेला आवडेल ते खात राहतो, असे अन्न पचत नाही, पर्यायाने शरीराला त्रास होतो. यातूनच पुढे आजार उत्पन्न होतात.
अन्न शरीरात गेल्यावर अन्नाचे रूपांतर काही द्रव्यात करून ते शरीरात साठवता येते. ही प्रक्रिया शरीरात केली जातेच. माणसाची आवक कितीही कमी असली तरी अडीअडचणीला उपयोगी पडावी, यादृष्टीने काही तरी शिल्लक टाकावे हे अनेकांना कळत नाही; परंतु ही गोष्ट निसर्गाला नक्की माहीत असते. निसर्ग फळे उत्पन्न करतो त्या वेळी त्यातील काही फळांतील बियांपासून पुन्हा उत्पत्ती व्हायची आहे हे लक्षात घेतो, तसेच शरीरात आलेले काही अन्न रूपांतरित करून शरीरात साठवले जाते. कारण काही कारणामुळे भूक भागवली गेली नाही अशी वेळ आली तर या साठ्याच्या उपयोग होतो; पण शरीरात वाजवीपेक्षा अधिक अन्न टाकण्याचा प्रयत्न केला तर शरीर बेढब होऊ लागते. अशा वेळी त्या जादा अन्नाचा साठविण्यासाठी उपयोग होत नाही. तेव्हा भूक लागली की भूक भागेल एवढे खाऊन घेणे हेच इष्ट असते. शिवाय दोन घास कमी खाल्ले तर पुढची भूक नैसर्गिकपणे वेळेवर लागते. खाल्लेले सर्व अन्न शरीराला पचवता यावे अशी संधी आपण शरीराला देणेही आवश्यक असते. शरीरात आलेले अन्न पचले नाही तर पुढची भूक वेळेवर लागणार नाही. भूक वेळेवर लागली नाही तर शरीर भुकेची खूण देत नाही.
अन्नाप्रमाणेच मनुष्याला इतर गोष्टींचीही भूक असते. उदा. पैशांची भूक, शारीरिक सुखाची भूक वगैरे; परंतु सर्व भुकांच्या तळाशी असते अन्नाची भूक. अन्नानेच शरीर तयार होत असते. तेव्हा भूक लागल्यावर चांगले सात्त्विक अन्न खाणारा मनुष्य हा सत्त्ववान् होऊन त्याचे कल्याण होते.
म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे, की भूक लागली असली तरी आपल्याला न पचणारे, पूर्वी कधीही न खाल्लेले, पहिल्याच घोटाला उचकी लागेल असे, कसे-बसे गिळावे लागते आहे असे अन्न खाऊ नये. अशा अन्नामुळे भूक भागवली गेली तरी पुढे आजारपणाला तोंड देण्याची वेळ येते.
एकूण, भुकेचे तंत्र समजून घेणे खूप आवश्यक आहे. आपण ठरविलेल्या वेळी साधारणपणे भूक लागतेच, पण तरीही भूक लागली असेल तेवढेच अन्नग्रहण करावे. भुकेमुळे जीव कासावीस होण्याची वेळ येऊ देऊ नये. वेळेवर व भूक असेल तेवढेच जेवावे. पोटाला तडस लागेल एवढे कधीही खाऊ नये. म्हणून असे म्हटले जाते, की अर्धे पोट अन्नाने, पाव पोट पाण्याने भरावे आणि पाव पोट हवेसाठी जागा ठेवावी, जेणेकरून अन्न नीट पचून शरीराचे कल्याण होईल.