Showing posts with label Rose Information in Marathi Gulab Mahiti / गुलाब माहिती Rose Flower Information in Marathi. Show all posts
Showing posts with label Rose Information in Marathi Gulab Mahiti / गुलाब माहिती Rose Flower Information in Marathi. Show all posts

Wednesday, January 8, 2020

Rose Information in Marathi


Rose Information in Marathi

Gulab Mahiti / गुलाब माहितीGulab Mahiti / गुलाब माहिती

गुलाब म्हणताच एक मंद सुगंधाची झुळूक हलकेच मनाला स्पर्शून जाते. फुलांचा राजा हे नाव गुलाबाला अगदी सार्थ ठरते. गुलाब हे अतिशय सुंदर, मनमोहक आणि सुवासिक फूल आहे. म्हणूनच शिव पुराणामध्ये गुलाबाला 'देवपुष्प' संबोधले आहे. आपल्या कोमलता आणि सुंदरतेमुळे हे फूल जगभर सर्व लोकांत खूपच प्रिय आहे.

bourbon rose information in marathi

भारतात तीन प्रकारचे गुलाब आढळतात, कलमी, देशी आणि रानटी गुलाब. गुलकंद आणि अत्तर तयार करण्यासाठी देशी गुलाबाची फुलेच वापरली जातात. कारण ती फार सुगंधी असतात. रानटी गुलाबांच्या रोपावर कलम करून विलायती जातीचे गुलाब बनविले जाते. भारतात विलायती गुलाबांच्या जवळपास 210 जाती आहेत. विविध रंगांचे गुलाब बागांची शोभा वाढवतो. 

तसेच गुलाबाचे फूल प्रेमाचे, मैत्रीचे आणि शांततेचे प्रतीक आहे. तसेच याचा उपयोग घरांची सजविण्यासाठी, हार, पुष्पगुच्छ बनवण्यासाठी सुद्धा होतो. स्त्रिया शृंगार करण्यासाठी याला डोक्‍यात माळतात. गुलाबाच्या झाडाला बहुधा बारमाही फूल येते. फक्‍त मोकळी हवा, भरपूर सूर्यप्रकाश आणि मध्यम तापमान मुबलक प्रमाणात उपलब्ध पाहिजे. 

या फुलाच्या उपयोगितेमुळे याचा मोठ्या प्रमाणात व्यवसायदेखील केला जातो. भारतातूनही वेगवेगळ्या प्रकारच्या गुलाबाच्या फुलांची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. क्षारयुक्‍त जमिनीत गुलाबाचे रोपटे चांगले बहरत नाही. त्यासाठी उत्तम निचरा होणारी जमीन आणि जमिनीचा पी.एच. 6 ते 7 पर्यंत असावा लागतो. तसेच चांगल्या प्रतीची माती गरजेची असते.

Gulab fulachi mahiti marathi

  • पंडित जवाहरलाल नेहरू गुलाबाचे फुल आपल्या कोटाच्या खिशात लावत असत. ते त्यांना अतिशय प्रिय होते.
  • गुलाब ह्या फुलाला फुलांचा राजा समजले जाते. शिव पुराणामध्ये गुलाबाला देवपुष्प संबोधले आहे.
  • गुलाब हे अतिशय सुंदर आणि मनमोहक फुल आहे. तसेच ते सुवासिकही आहे. आपली सुंदरता आणि कोमलतेमुळे हे फुल लोकांत खूप प्रिय आहे. आणि म्हणूनच लहान मुलांन गुलाबाची उपमा दिली जाते.
  • भारतात तीन प्रकारचे गुलाब आढळतात, कलमी, देशी आणि रानटी गुलाब.
  • रानटी गुलाबांच्या रोपावर कलम करून विलायती जातीचे गुलाब बनविले जाते. भारतात विलायती गुलाबांच्या जवळपास १०० जाती आहेत.
  • विविध रंगांचे गुलाब बागांची शोभा वाढवतो. तसेच गुलाबाचे फुल प्रेमाचे, मैत्रीचे आणि शांततेचे प्रतिक आहे. तसेच याचा उपयोग घरांची सजवण्यासाठी, हार, पुष्पगुच्छ बनवण्यासाठी सुद्धा होतो. स्त्रिया शृंगार करण्यासाठी याला डोक्यात माळतात.
  • गुलाबाच्या झाडाला बहुधा बारमाही फुल येते. फक्त मोकळी हवा, भरपूर सूर्यप्रकाश आणि मध्यम तापमान मुबलक प्रमाणात उपलब्ध पाहिजे.
  • या फुलाच्या उपयोगितेमुळे याचा मोठया प्रमाणात व्यवसाय देखील केला जातो. भारतातूनही वेगवेगळ्या प्रकारच्या गुलाबाच्या फुलांची मोठया प्रमाणात निर्यात होते.
  • आढळते.
  • गुलकंद आणि अत्तर तयार करण्यासाठी देशी गुलाबाची फुलेच वापरली जातात कारण ती फार सुगंधी असतात.
  • गुलाबापासून अत्तर बनवण्याचा आविष्कार नुरजहाने केला. गुलाबाच्या पाकळ्या आणि साखर यांच मिश्रण करून गुलकंद बनवले जाते.
  • लाल, गुलाबी, पिवळ्या गुलाबांसह हिरव्या आणि काळ्या रंगाची गुलाबेही काही ठिकाणी फुलतात. हिरव्या गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या ह्या पानांसारख्या भासतात. काळ्या रंगाचे गुलाब खरेतर गडद लाल रंगाचे असते.
  • गुलाब हे इंग्लंडचे राष्ट्रीय फुल आहे तसेच अमेरिकेचे राष्ट्रीय प्रतिक सुद्धा आहे.
  • खूप कमी लोकांना हे माहित आहे कि गुलाबाचे फुल झडल्यानंतर त्याला फळे लागतात ज्यांचा रंग लाल, जांभळा किंवा काळा असतो.
  • २००९मध्ये जेनेटिक इंजिनिअरिंगच्या सहाय्याने सर्वात पहिले निळे गुलाब बनविले गेले.
  • या फळांपासून बनविण्यात आलेल्या शरबतात मोठया प्रमाणात विटामिन सी आढळते. तसेच याचे अनेक औषधीय उपयोगही आहेत.
  • क्षारयुक्त जमिनीत गुलाबाचे रोपटे चांगले बहरत नाही. त्यासाठी उत्तम निचरा होणारी जमीन आणि जमिनीचा पी.एच. ६.० ते ७.५ पर्यंत असावा लागतो. तसेच चांगल्या प्रतीची माती गरजेची असते.
  • भारत सरकारने १२ फेब्रुवार हा दिवस ‘गुलाब दिवस’ म्हणून घोषित केला आहे.
  • काश्मीर आणि भूतान मध्ये पिवळ्या रंगाची जंगली गुलाबी फुले मोठया संख्येने आढळतात.
  • गुलाबाचे झाड रोपट्यासारखे असते त्याला टोकदार काटे असतात. काही ठिकाणी ते वेलीसारखेही 
शतपत्रीतरुण्युक्‍ता कर्णिकाचारुकेशरा |
महाकुमारी गन्धाद्या लाक्षा कृष्णातिमञ्जुला 
||
शतपत्री हिमाहृद्या ग्राहिणी शुक्रला लघु: 

दोषत्रयास्रजिद्वर्ण्या कट्वी तिक्‍ता च पाचनी 
||


गुलाबाचे तेल उत्तम ऍस्ट्रिन्जेंट आहे. ते हिरड्या व केसांची मुळे मजबूत करते. तसेच स्नायू व रक्‍तवाहिन्यांसाठीही उत्तम असते. गुलाबाच्या तेलामुळे जखमेतून वाहणारे रक्‍त त्वरित थांबते. गुलाबपाणी त्वचेसाठी सौंदर्यदायक आहे. ते त्वचेचे पीएच् संतुलन ठेवते आणि उत्तम टोनर म्हणून काम करते. गुलाबाच्या तेलाने व सुवासाने मनातली निराशा दूर होते. या तेलाने मनाचा आत्मविश्‍वास व सकारात्मकता वाढते.

खूप कमी लोकांना हे माहीत आहे की गुलाबाचे फूल झडल्यानंतर त्याला फळे लागतात ज्यांचा रंग लाल, जांभळा किंवा काळा असतो. हे फळ ए, बी, सी, डी व ई जीवनसत्त्वांनी तसेच इतर मिनरल्सनी समृद्ध असते. डायरियावरील उपचारांत त्याचा उपयोग केला जातो. ताप येण्यापासून रोखण्यातही गुलाबाचे तेल उपयुक्‍त आहे. तापात सूक्ष्म जंतूंमुळे येणारी सूज, अपचन, रसायन आणि निर्जलीकरण कमी करण्यात हेच तेल मदत करते. 

गुलाबपाण्याचा उपयोग हर्बल चहा बनविण्यासाठीही केला जातो. हा चहा पोटाचे रोग आणि मूत्राशयातील जंतूसंसर्ग दूर करतो. या चहामुळे मनाला शांती मिळते. कधीही प्यावा असा हा चहा तनामनाला आराम व स्फूर्ती देतो. तीव्र उन्हापासून गुलाबपाणी आपल्या त्वचेचे रक्षण करते. असा हा गुलाब. सुंदर आणि सुवासिक. तन, मन आणि आपले घरदेखील प्रसन्न करणारा, आवर्जून कुंडीत जोपासला जाणारा. हवाहवासा !!!

अतिघाम किंवा दुर्गंधी येत असेल तर हीच पावडर लावल्यास ती घामाचे नियंत्रण करते आणि चांगला सुवास देते. सौंदर्यप्रसाधने, अत्तरे, तेले अशा कितीतरी उत्पादनांमध्ये सुवासिक आणि औषधी म्हणून गुलाबाचा वापर केला जातो. गुलाबाच्या नियमित सेवनाने रंग उजळतो, हृदयाची धडधड कमी होते. रक्‍ती मूळव्याध व श्‍वेतप्रदर कमी होतो. निद्रानाश, उन्माद, नेत्ररोग आणि मूत्रव्याधी गुलाबपाण्याने कमी होतात. गुलकंदामुळे उष्णता व उन्हाळ्याचा त्रास कमी होतो.

निराशा दूर करणारा, पित्तनाशक, शीतलता देणारा, जंतूनाशक, रक्‍तवर्धक, सौंदर्यवर्धक, पाचक अशा कितीतरी औषधी गुणांनी गुलाब समृद्ध आहे. पाकळ्यांची पेस्ट किंवा पाकळ्यांची पावडर जखमांवर लावल्यास जखम लवकर भरून येते. डोळ्यांची आग किंवा जळजळ होत असेल तर, गुलाबाच्या पाकळ्यांच्या अर्काचे थेंब डोळ्यांत घातल्यास आराम वाटतो. ऍरोमा थेरपीत, इन्सोम्निया आणि ब्लडप्रेशरचा उपचार म्हणून रोझ इसेन्शियल ऑईल वापरले जाते. पाकळ्यांची पावडर पोटात घेतल्यास ती अतिसार, अल्सर, पित्त, अपचन यावर उत्तम औषधी ठरते. 




jasmine flower information in marathiten flowers information in marathiflowers information in marathi pdfhibiscus information in marathisunflower information in marathisarva fulanchi mahiti marathi