Wednesday, January 8, 2020

चंद्रग्रहण २०२०: गरोदर महिलांनी 'अशी' घ्यावी काळजी | उपाय

चंद्रग्रहण २०२०: गरोदर महिलांनी 'अशी' घ्यावी काळजी

चंद्रग्रहण २०२०: गरोदर महिलांनी 'अशी' घ्यावी काळजी



नववर्ष २०२० मध्ये संपूर्ण वर्षांत एकूण ६ ग्रहण होणार आहेत. यामध्ये २ सूर्यग्रहण आणि ४ चंद्रग्रहणांचा समावेश आहे. १० जानेवारी २०२० रोजी पौष पौर्णिमेच्या दिवशी या वर्षातील पहिले चंद्रग्रहण होणार आहे. हे ग्रहण एकूण ४ तास ५ मिनिटे सुरू राहील. हे पूर्ण चंद्रग्रहण नसून, छायाकल्प चंद्रग्रहण असणार आहे.
Lunar Eclipse 2020: महज खगोलिय घटनाक्रम नहीं है चंद्रग्रहण, जानिए धर्म और विज्ञान में महत्‍व Agra News
खगोल शास्त्रानुसार चंद्रग्रहण ही निव्वळ खगोलीय घटना आहे. परिक्रमा पूर्ण केल्यानंतर पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्यामध्ये येते तेव्हा चंद्र झाकला जातो आणि चंद्रग्रहण होते. जेव्हा सूर्य आणि चंद्राच्या दरम्यान पृथ्वी येते तेव्हा सूर्याची किरणे चंद्रापर्यंत पोहोचत नाही. त्यावेळी चंद्रग्रहण लागले, असे मानले जाते. पृथ्वीच्या चोहोबाजूला फिरणारा चंद्र हा पृथ्वीचा एक उपग्रह आहे. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी सूर्य आणि पौर्णिमेच्या दिवशी चंद्र झाकला जातो, अशी धार्मिक मान्यता आहे.

चंद्रग्रहणात करा 'हे' उपाय 

असं म्हटलं जातं की ग्रहण काळात पूजा करु नये, गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी. ग्रहण काळात शिव-चालीसाचं पठण करावे. ग्रहण संपल्यानंतर गंगा स्नान करावे. तसेच चंद्रग्रहणानंतर गंगा जलने घराचं शुद्धिकरण करा. असंही म्हटलं जातं की, ग्रहणानंतर गरीबांना जेवण द्यावं आणि गरजूंना दान करावे.
चंद्रग्रहणात शिव-चालीसा, हनुमान चालीसा, शनी मंत्राचा जप करावा. ग्रहण काळात जेवण बनवू नये आणि करुही नये. या काळात पाणी पिऊ नये असंही म्हटलं जातं. तसेच पाण्यात तुळशीपत्र ठेवावे असं बोललं जातं. 


विशेष करून गरोदर महिलांनी ग्रहण काळात करावयाच्या गोष्टींविषयी आपल्याकडे अनेक धारणा आहेत. चंद्रग्रहणाचे वेध लागले की, पिण्याच्या पाण्यावर तुळशीपत्र ठेवावे. तुळशीची पाने घातलेले पाणी ग्रहणकाळात प्यावे. तुळशीच्या पानांमुळे पाणी दुषित होत नाही.


चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण या केवळ खगोलीय घटना असली तरी, भारतीय संस्कृतीमध्ये या घटनेला विशेष महत्त्व आहे. ग्रहण काळात कोणत्या गोष्टी खाव्यात, काय खाऊ नये, कोणती पथ्ये पाळावीत, याविषयी अनेक समजुती आपल्याकडे आहेत. 


गरोदर महिला आणि ज्येष्ठ व्यक्तींनी घ्यावयाची काळजी


ग्रहणाचा काळ गरोदर महिलांनी अधिक जपावा, असे सांगितले जाते. ग्रहणकाळात गरोदर महिलांनी घराबाहेर पडू नये. ग्रहणकाळात जास्तीत जास्त आराम करावा. या काळात जप-जाप करावेत. ग्रहणकाळात झोपण्याविषयीदेखील काही समज आहेत. मात्र, गरोदर महिला, आजारी व्यक्ती यांनी ही पथ्ये पाळली नाहीत, तरी चालतात. ग्रहण काळात गरोदर महिलेने शांत बसून नामस्मरण केल्यास त्याचा अधिक लाभ होतो. ग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी कोणतीही गोष्ट शिळी खाऊ नये, असे सांगितले जाते.


नारळ पाण्याचे महत्त्व


ग्रहणकाळात शक्यतो पाणी पिऊ नये, असा समज आहे. मात्र, पाणी प्यावेच लागले, तर तुळशीची पाने घातलेले पाणी प्यावे. अन्यथा नारळपाणी प्यायले, तरी चालेल.


खाण्याची पथ्ये


चंद्रग्रहणकाळात साधनेला अधिक महत्त्व आहे. याकाळात आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करावे. ग्रहणकाळात घरातील शिजवलेल्या खाद्यपदार्थांवर तुळशीपत्र ठेवावे. ग्रहणकाळात शक्यतो काही खाऊ नये. मात्र, कडाक्याची भूक लागली असेल, घरात आजारी व्यक्ती असतील, महिला गरोदर असतील, काही व्याधी जडलेल्या व्यक्ती अन्नग्रहण करू शकतात. संपूर्ण नियमित जेवण ग्रहण सूटल्यानंतर करावे.


चंद्रग्रहण २०२०: 'या' राशींवर पडणार प्रभाव


चंद्रग्रहणाचे वेळापत्रकः


ग्रहण स्पर्श - रात्री १० वाजून ३९ मिनिटे

ग्रहण मध्य - रात्री १२ वाजून ३९ मिनिटे
ग्रहण मोक्ष - मध्यरात्री २ वाजून ४० मिनिटे
ग्रहणाचा एकूण अवधी - सुमारे ४ तास

वर्ष २०२० मधील आगामी ग्रहणेः


१० जानेवारी - चंद्रग्रहण

५ जून - चंद्रग्रहण
२१ जून - सूर्यग्रहण
५ जुलै - चंद्रग्रहण
३० नोव्हेंबर - चंद्रग्रहण
१४ डिसेंबर - सूर्यग्रहण

No comments:

Post a Comment