प्रख्यात ऊर्दू कवी, शायर व गीतकार साहिर लुधियानवी यांची आज जयंती. साहिर यांच्या आशयघन व अर्थपूर्ण गीतांनी एकेकाळी हिंदी चित्रपटसृष्टीवर अक्षरश: अधिराज्य गाजवलं. तो काळ सरला. साहिर लुधियानवीही काळाच्या पडद्याआड गेले, मात्र, त्यांच्या गीतांची मोहिनी आजही संगीत रसिकांच्या मनावर कायम आहे. साहिर यांच्या सगळ्याच रचना काळाच्या कसोटीवर उतरलेल्या आहेत. यापैकीच दहा कालातीत गीतरचनांचा नजराणा आमच्या वाचकांसाठी...
कारण रफीमुळे मन्ना डे, मुकेश, तलत यांची गुणवत्ता झाकली गेली असं म्हणता येत नाही. ... “चलो इकबार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो” सारखं अजरामर गाणं देणार्या महेंद्र कपुरच्या वाट्याला “देशभक्तीपर” गीतांचा गायक म्हणवुन ... चोप्रा, साहिर लुधियानवी, महेंद्र कपुर आणि रवी या चमुची गाणी हा एकंदर हिन्दी चित्रपट संगितातलाच वैभवशाली अध्याय आहे बिनाका गीतमाला १९५२ – गाजलेले चित्रपट आणि अजरामर गाणी. . तुम्हाला माहीत आहे का … अनेक दिग्गज संगीतकार, अभिनेते यांनी १९५२ साली Debut केला आहे. या सालातील काही विशेष चित्रपट आणि संगीता ची सफर करू या याच सरदार मलिकनं दिलेली 'सारंगा' (१९६०) मधील भारत व्यास यांची.. 'सारंगा, तेरी याद में, नैन हुए बेचैन..' आणि 'हां दिवाना हूं मैं, गम का मारा हुआ, इक बेगाना हूं मैं..' ही मुकेशची अजरामर गाणी. यांतील 'सारंगा तेरी याद में..' चं रफीचं ...गाण्यांना संगीत देणार्या संगीतकारांच्या आठवणीत व ही अजरामर गाणी शब्दबद्ध करणार्या गीतकारांच्या ... पारुल घोष, नूरजहान, गीता दत्त व बेग़म अख़्तर या गायिका, तलत महमूद हा गायक, मजाज़, साहिर व शैलेंद्र हे गीतकार, ... असे स्वप्नाळू आवाजात गाणारी पारुल घोष ही बासरीवादक पन्नालाल घोष यांची पत्नी आणि संगीतकार अनिल बिश्वासची धाकटी बहीण. अभिनेत्री नूतनवर चित्रित झालेले व लतादिदींनी गाईलेले हे गीत चित्रपट संगीताच्या दुनियेत अजरामर झाले आहे. ... मजरूह सुलतानपुरी यांची शब्दरचना सुद्धा तितकीच परिणामकारक आहे. ... 'लोता गायेगा न तो हम सेफ है' याचा स्पष्ट अर्थ असा की, चित्रपटात लतादिदींची गाणी असणे म्हणजे चित्रपटाची ... (१० ऑक्टोबर १९०६) त्यांचे मूळ गाव बंगला देशातील कोमील्ला हे होय. ... म्हणून साहिर लुधीयानवी, शैलेंद्र, मजरूह सुलतानपुरी, निरज व गुलजार यांचेशी त्यांचे बरेच सख्य जमल्याचे दिसते.
संगीतकार एस. डी. बर्मन यांच्यासोबत साहिर यांची हिंदी चित्रपटसृष्टीतील वाटचाल सुरू झाली. पहिल्याच भेटीत सचिनदांना साहिर यांनी काही ओळी लिहून दिल्या. १९५१मध्ये आलेल्या 'नौजवान' चित्रपटात या गीताचा समावेश झाला आणि हे गीत प्रचंड लोकप्रिय ठरलं. साहिर यांनी या प्रेमगीतात संपूर्ण निसर्ग उभा केला होता. या गीतानं चित्रपटसृष्टीला साहिर यांच्या प्रतिभेची चुणूक दाखवून दिली. त्यानंतर त्यांनी मागं वळून पाहिलं नाही. हे गीत होतं 'ठंडी हवाए लहराके आये, रुत है जवाँ, तुम हो यहाँ, कैसे भुलायें...'
01:55 PMप्रख्यात अभिनेते व दिग्दर्शक गुरू दत्त यांनी प्रथमच दिग्दर्शित केलेल्या 'बाजी' चित्रपटासाठी साहिर यांनी लिहिलेले 'तदबीर से बिगडी हुई तकदीर बना ले...' या गीतानं लोकप्रियतेचे उच्चांक गाठले. अभिनेते देवानंद यांच्या म्हणण्यानुसार, हे एक गाणं ऐकण्यासाठी त्यावेळी लोक जोधपूरच्या हवाई दलाच्या केंद्रावर तुफान गर्दी करायचे.
01:54 PMपश्चिम बंगालमधील 'बाऊल' परंपरेत किर्तनाच्या स्वरूपात गायल्या जाणाऱ्या 'आन मिलो आन मिलो शाम सवाँरे...' हे गाणं साहिर यांच्यातील प्रतिभावंत गीतकारावर शिक्कामोर्तब करणारं ठरलं.
01:53 PMप्रेमातलं गहिरेपण दाखवण्यासाठी साहिर त्यांच्या अनेक गाण्यांमध्ये निसर्गातील वेगवेगळ्या प्रतिमांचा अचूक वापर करायचे. 'ठंडी हवाए लहराके आये...'नंतर देवानंद व कल्पना कार्तिकवर चित्रित करण्यात आलेल्या 'चुप है धरती चुप है चाँद सितारे...' या गाण्यातही साहिर यांनी तोच भन्नाट प्रयोग केला होता.
01:50 PMगुरु दत्तचा 'प्यासा' हा चित्रपट साहिर-एसडी बर्मन जोडीच्या यशस्वी कारकिर्दीतील कळसाध्याय म्हणावा लागेल. 'प्यासा' चित्रपटाच्या पोस्टरवर या दोघांचीही नाव झळकलेली दिसायची. मात्र, 'प्यासा'चं यश हे फक्त त्यातील गीत रचनांमुळं आहे, संगीतामुळं नव्हे, असं साहिर यांचं म्हणणं होतं. एसडी बर्मन यांच्या ते जिव्हारी लागलं आणि ही जोडी तुटली. पण 'प्यासा'तील त्यांच्या कलाकृती अजरामर ठरल्या. त्यातील साहिर यांनी लिहिलेली सर्वच गीतं अक्षरश: 'महान' असली तरी ये 'दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है...'ला तोड नाही.
01:49 PMसचिनदा दूर गेल्यानंतर साहिर आणि ओ. पी. नय्यर ही जोडी जमली. या जोडीनं 'नया दौर', 'तुमसा नही देखा' असे अनेक चित्रपट केले. १९५७मध्ये दिलीप कुमार व वैजयंती माला यांच्यावर चित्रित झालेल्या 'माँग के साथ तुम्हारा मैने माँग लिया संसार...' या गीतातील शब्दांनी तरुणाईला भारून टाकले होते. या शब्दांची जादू आजही संपलेली नाही.
01:48 PMसंगीतकार खय्याम यांच्यासोबत साहिर यांनी चित्रपटसृष्टीला अनेक अजरामर गीतं दिली. मात्र, 'कभी कभी' चित्रपटासाठी साहिर यांनी लिहिलेले 'मै पल दो पल का शायर...' हे शब्द अनेकांना हेलावून सोडले. साहिर यांनी त्यातून तमाम शायरांची व्यथाच मांडल्याचं बोललं गेलं...
01:47 PMहिंदी चित्रपटगीतांच्या क्षेत्रात साहिर यांनी दिलेल्या ऐतिहासिक योगदानाचं वर्णन 'हम दोनो'तील गीतांशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. 'अल्लाह तेरो नाम... कभी खुद पे कभी हालात पे... तसंच, मै जिंदगी का साथ निभाता चला गया...' अशी एकापेक्षा एक गाणी सांगता येतील. मात्र, 'अभी ना जाओ छोड कर...' यातील आर्तता शब्दांत पकडणं फक्त साहिरच जाणोत!
01:42 PMसाहिर यांच्या दहा सर्वोत्तम गीतांची यादी 'चित्रलेखा' चित्रपटातील गीताशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. संगीतकार रोशन यांनी 'यमन' रागात बसविलेल्या आणि मोहम्मद रफी यांनी आपल्या स्वर्गीय गायकीनं एका उंचीवर नेलेलं हे गीत म्हणजे 'मन रे तू काहे ना धीर धरे...'
01:41 PMआर. डी. बर्मन यांच्यासाठीही साहिर यांनी गीतलेखन केलं. 'आ गले लग जा'मधील त्यांच्या 'तेरा मुझसे है पहले का नाता कोई...'तील शब्दांनी अनेकांना भुरळ घातली. मात्र, 'जोशिला'मधील 'किसका रस्ता देखे ऐ दिल ऐ हरजाई...' हे तात्विक शब्द वेड लावून जातात.
कारण रफीमुळे मन्ना डे, मुकेश, तलत यांची गुणवत्ता झाकली गेली असं म्हणता येत नाही. ... “चलो इकबार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो” सारखं अजरामर गाणं देणार्या महेंद्र कपुरच्या वाट्याला “देशभक्तीपर” गीतांचा गायक म्हणवुन ... चोप्रा, साहिर लुधियानवी, महेंद्र कपुर आणि रवी या चमुची गाणी हा एकंदर हिन्दी चित्रपट संगितातलाच वैभवशाली अध्याय आहे बिनाका गीतमाला १९५२ – गाजलेले चित्रपट आणि अजरामर गाणी. . तुम्हाला माहीत आहे का … अनेक दिग्गज संगीतकार, अभिनेते यांनी १९५२ साली Debut केला आहे. या सालातील काही विशेष चित्रपट आणि संगीता ची सफर करू या याच सरदार मलिकनं दिलेली 'सारंगा' (१९६०) मधील भारत व्यास यांची.. 'सारंगा, तेरी याद में, नैन हुए बेचैन..' आणि 'हां दिवाना हूं मैं, गम का मारा हुआ, इक बेगाना हूं मैं..' ही मुकेशची अजरामर गाणी. यांतील 'सारंगा तेरी याद में..' चं रफीचं ...गाण्यांना संगीत देणार्या संगीतकारांच्या आठवणीत व ही अजरामर गाणी शब्दबद्ध करणार्या गीतकारांच्या ... पारुल घोष, नूरजहान, गीता दत्त व बेग़म अख़्तर या गायिका, तलत महमूद हा गायक, मजाज़, साहिर व शैलेंद्र हे गीतकार, ... असे स्वप्नाळू आवाजात गाणारी पारुल घोष ही बासरीवादक पन्नालाल घोष यांची पत्नी आणि संगीतकार अनिल बिश्वासची धाकटी बहीण. अभिनेत्री नूतनवर चित्रित झालेले व लतादिदींनी गाईलेले हे गीत चित्रपट संगीताच्या दुनियेत अजरामर झाले आहे. ... मजरूह सुलतानपुरी यांची शब्दरचना सुद्धा तितकीच परिणामकारक आहे. ... 'लोता गायेगा न तो हम सेफ है' याचा स्पष्ट अर्थ असा की, चित्रपटात लतादिदींची गाणी असणे म्हणजे चित्रपटाची ... (१० ऑक्टोबर १९०६) त्यांचे मूळ गाव बंगला देशातील कोमील्ला हे होय. ... म्हणून साहिर लुधीयानवी, शैलेंद्र, मजरूह सुलतानपुरी, निरज व गुलजार यांचेशी त्यांचे बरेच सख्य जमल्याचे दिसते.
No comments:
Post a Comment