Tuesday, December 29, 2015

धोका किडनी विकाराचा

कायमस्वरूपी डायल‌िसि‌स रुग्णांना राजीव गांधी योजनेतून माफक दरात हे उपचार घेता येतात.

उच्च रक्तदाब, मधुमेह कारणामुळे किडनी (मूत्रपिंड) फेल्यूअरचे प्रमाण दिवसेंदिवस
वाढत आहे. किडनी निकामी झाल्यानंतर एकतर आयुष्यभर डायल‌िसि‌सवर जगावे लागते किंवा
किडनी प्रत्यारोपण हा त्यावर शेवटचा उपाय असतो. किडनी प्रत्यारोपणासाठी तीन ते पाच
लाख रुपये खर्च येतो. सध्या कोल्हापुरात सात ठिकाणी डायल‌िसि‌स सेंटर सुरू आहेत. तेथे
दरमहा किमान दोन हजारांवर डायल‌िसि‌स रूग्ण येतात.
डायल‌िसि‌सची सुविधा आणि खर्च गोरगरिबांच्या आवाक्याबाहेर असतो.
राजीव गांधी योजनेतून डायल‌िसि‌स उपचार मोफत केले जातात. कोल्हापुरात किडनीग्रस्त
हजारो रुग्ण आहेत.


 शहरातील पाचशेहून अधिक रुग्णांना कायमस्वरूपी आठवड्यातून दोन ते तीनवेळा डायल‌िसि‌स
करावे लागते. एका डायल‌िसि‌सला खासगी सेंटरमध्ये एक हजार रुपये, तर सीपीआरमध्ये ५००
रुपये आकारले जातात.


गेल्या काही महिन्यांपूर्वी
प्रत्येक जिल्ह्यात डायल‌िसि‌सची सोय आहे की नाही, अशी विचारणा सुप्रीम कोर्टाने
सरकारकडे केली होती. मात्र, अशी पुरेशी सुविधा नसल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना
उपचारासाठी शहरात यावे लागते. 


 कोल्हापुरात डायल‌िसि‌सची ४1 ते ४6 मश‌िन आहेत. दर महिन्याला दोन हजारहून अधिक
डायल‌िसि‌स होत असून, तेथे दीडशे ते पावणेदोनशे डायल‌िसि‌स करणारे कर्मचारी आहेत.
किडनी आजाराच्या विळख्यात 33 टक्क्यांहून अधिक रुग्ण आहेत. 




त्यामुळे आठवड्यातील दोन ते तीन दिवस केवळ
हॉस्पिटलमध्येच जातात. रुग्णाला डायल‌िसि‌ससाठी महिन्याला पंधरा हजारांहून अधिक खर्च
येतो. शिवाय एका कीटसाठी तीन हजार रुपये भरावे लागतात. एका कीटवर साधारण चार ते
पाच डायल‌िसि‌स होतात. त्यामुळे महिन्याकाठी वीस हजारांपुढे होणारा खर्च सामान्य
रुग्णाच्या आवाक्याबाहेर आहे.

किडनी निकामी झाल्यानंतर डायल‌िसि‌स हा एकमेव पर्याय असतो. मात्र, आठवड्यातून
दोन-तीनदा डायल‌िसि‌स करणे आवश्यक असते. चार तास लागत असलेल्या उपचारासाठी शहरात
सात ठिकाणी सुविधा असून, केशरी व पिवळे रेशनकार्ड असलेल्या रुग्णावर मोफत उपचार उपलब्ध
आहेत.

No comments:

Post a Comment